माहिती अधिकारातील माहितीतून धक्कादायक वास्तव उघड !
माहिती अधिकारातील माहितीतून धक्कादायक वास्तव उघड !
यवतमाळ, २० जुलै (वार्ता.) – नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेकडे मागितलेल्या माहितीतून वर्ष २०११–२०१२ पासून २०२०–२०२१ पर्यंतच्या १० वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांचे ८ लाख ८४ सहस्र ६७९ कोटी रुपये बुडीत खात्यात गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. वाटप केलेले कर्ज वसूल करण्यातील उदासीनतेमुळे थकित रकमेचा आकडा वाढला. बँकांनी उद्योजक आणि व्यावसायिक यांना अवाजवी कर्जवाटप केले. वसुलीसाठी दीर्घकाळपर्यंत सवलत दिली. खासगी बँकांप्रमाणे वसुली मोहीम राबवण्यास बँका अपयशी ठरल्या. कर्जदाराची विनाउपयोगी मालमत्ता जप्त करून विकल्यानंतरही वसुली अपूर्णच राहिली, अशीही माहिती उघड झाली आहे.