उत्तर महाराष्ट्र-मराठवाडा येथील धरण क्षेत्रांत पुरेसा पाऊस न पडल्याने चिंता वाढली !

संभाजीनगर – जुलै संपत आला, तरी राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाणीटंचाईमुळे चिंता निर्माण झाली आहे. या वर्षी उत्तर महाराष्ट्रात पाऊस अल्प पडला आहे, तसेच पुणे विभागातील धरणांत पाणीसाठा अल्प आहे. कोकण किनारपट्टी ते कर्नाटकपर्यंत अल्प दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे कोकणसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत २० ते २३ जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (धरणांत अल्प पाणीसाठा असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक ! – संपादक)