स्कॉटलंड येथे ‘एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवा’त सादर करण्यात येणार हिंदु देवतांचे विडंबन असणारे नाटक !

विदेशात हिंदु देवतांच्या होणार्‍या विडंबनाविरुद्ध अन्य देशांतील हिंदू आवाज उठवतात; पण हिंदूबहुल भारतातील सरकारी यंत्रणा आणि बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटना मात्र गप्प बसतात ! हे त्यांना लज्जास्पद !

जंक फूडमुळे आरोग्यावर होणार्‍या परिणामांविषयी ट्विटरवर झालेला #NoJunkFood_StayHealthy ट्रेंड तिसर्‍या क्रमांकावर !

नुकतेच ‘फायनॅन्शियल टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये जगातील खाद्यपदार्थ बनवणारे आस्थापन ‘नेस्ले’ने म्हटले आहे, ‘तिचे ६० टक्के खाद्यपदार्थ जंक फूड या श्रेणीमध्ये येतात आणि ते आरोग्यास चांगले नाहीत.’ आज जंकफूडच लोकप्रिय अन्न बनले आहे.

बिहार-नेपाळ सीमेवर सापडले ८ चीननिर्मित ड्रोन !

जम्मूमधील सैन्य आणि वायू दल यांच्या तळांच्या परिसरात जिहादी आतंकवाद्याकडून ड्रोनच्या माध्यमांतून आक्रमण करण्याचा प्रयत्न होत असतांना आता बिहारमधील नेपाळ सीमेवरही ८ चीननिर्मित ड्रोन सापडले आहेत. 

कोलकाता येथे धर्मांधाकडून धारदार शस्त्राने हिंदु मालक आणि त्यांचा चालक यांच्यावर आक्रमण !

कहार मोल्ला नावाच्या एका धर्मांधाने त्याचा हिंदु मालक आणि चालक यांच्यावर धारदार शस्त्राने आक्रमण केल्याची घटना येथील कसबा भागात नुकतीच घडली. मोल्ला हा कपडे बनवण्याच्या कारखान्यात कामाला आहे.

(म्हणे) ‘चीनवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास ठेचून टाकू !’

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! चीन भारतासह अनेक देशांवर दबाव निर्माण करून जागतिक महाशक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे. चीनचा हा प्रयत्नच जगाने संघटित होऊन ठेचून काढण्याची आवश्यकता आहे !

देशात भगवान शिव, श्री हनुमान आणि श्री गणेश यांच्यावर हिंदूंची अधिक श्रद्धा ! – ‘प्यू रिसर्च सेंटर’चे सर्वेक्षण

‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेच्या सर्वेक्षणाच्या अहवालातील अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. ‘हिंदूंचा सर्वांत आवडता देव कोणता ?’ असा प्रश्‍न या सर्वेक्षणामध्ये हिंदूंना विचारण्यात आला होता.

अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी संबंधित व्यक्ती अल्पवयीन असल्यास ती सज्ञान होण्याची वाट पहाण्याची आवश्यकता नाही !

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाचा निर्णय !

दरभंगा रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी लष्कर-ए-तोयबाच्या दोघा आतंकवाद्यांना अटक

बिहारच्या दरभंगा रेल्वे स्थानकामध्ये १७ जून या दिवशी पार्सल बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने लष्कर-ए-तोयबाच्या इम्रान मलिक आणि महंमद नासीर या दोघा आतंकवाद्यांना अटक केली आहे.

सध्या तिसर्‍या महायुद्धाची शक्यता नाही ! – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सध्या तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. काही दिवसांपूर्वी काळ्या समुद्रामध्ये रशियाच्या वायूदलाने ब्रिटनच्या युद्धनौकेला हाकलून लावले होते.

निवडणुकांच्या माध्यमांतून सरकार पालटता येते; पण अत्याचार दूर होण्याची हमी देता येत नाही ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

जे सरन्यायाधिशांना वाटते, ते जनता गेली ७४ वर्षे पहात आहे. त्यामुळे ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांच्या धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !