अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी संबंधित व्यक्ती अल्पवयीन असल्यास ती सज्ञान होण्याची वाट पहाण्याची आवश्यकता नाही !

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाचा निर्णय !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीपूर्वी निधन झाल्यास अनुकंपा तत्त्वावर कुटुंबातील व्यक्तीची नोकरीत नियुक्ती करतांना जर व्यक्ती अल्पवयीन असेल, ती शिक्षण घेत असेल, तर ती सज्ञान होईपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही. कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबासमोर आर्थिक संकट निर्माण झालेले असते आणि तेच अनुकंपेसाठी एकमेव आधार आहे, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने एका याचिकेवर सुनावणी करतांना दिला आहे.