सध्या तिसर्‍या महायुद्धाची शक्यता नाही ! – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन

महायुद्ध (प्रातिनिधिक छायाचित्र)

मॉस्को (रशिया) – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सध्या तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. काही दिवसांपूर्वी काळ्या समुद्रामध्ये रशियाच्या वायूदलाने ब्रिटनच्या युद्धनौकेला हाकलून लावले होते. त्यासाठी रशियाने या युद्धनौकेच्या मार्गावर बॉम्ब फेकला होता. या घटनेवरून ‘तिसरे महायुद्ध होणार का ?’, असे पुतिन यांना विचारले असता ते म्हणाले की, जर रशियाने ब्रिटेनचीयद्धनौका बुडवली जरी असती, तरी महायुद्ध झाले नसते; कारण सर्वांना ठाऊक आहे की, जागतिक युद्धामध्ये त्यांचा निभाव लागणार नाही.