देशात भगवान शिव, श्री हनुमान आणि श्री गणेश यांच्यावर हिंदूंची अधिक श्रद्धा ! – ‘प्यू रिसर्च सेंटर’चे सर्वेक्षण

नवी देहली – ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेच्या सर्वेक्षणाच्या अहवालातील अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. ‘हिंदूंचा सर्वांत आवडता देव कोणता ?’ असा प्रश्‍न या सर्वेक्षणामध्ये हिंदूंना विचारण्यात आला होता. या वेळी ९७ टक्के हिंदूंनी ते आस्तिक असल्याचे सांगत भगवान शिव, श्री हनुमान आणि श्रीगणेश यांच्यावर त्यांची सर्वाधिक श्रद्धा असल्याचे नमूद केले. दुसरीकडे बौद्धांमध्ये एक तृतीयांश लोकांनी सांगितले की, ते देवावर विश्‍वास ठेवत नाहीत.

१. सर्वेक्षणामध्ये हिंदूंना विविध देवतांची चित्रे दाखवून प्रश्‍न विचारण्यात आले. यात ४४ टक्के हिंदूंनी भगवान शिव, ३५ टक्के हिंदूंनी  श्री हनुमान, तर ३२ टक्के हिंदूंनी  श्रीगणेश त्यांचे श्रद्धास्थान असल्याचे सांगितले.

२. पश्‍चिम भारतामध्ये ४६ टक्के लोकांनी , तर पूर्वेमधील १५ टक्के  लोकांनी श्रीगणेश हे त्यांचे श्रद्धास्थान असल्याचे सांगितले. पूर्वोत्तर भारतातील ४६ टक्के लोकांनी भगवान श्रीकृष्णावर त्यांची अधिक श्रद्धा असल्याचे सांगितले. दक्षिण भारतात ही टक्केवारी केवळ १४ टक्के इतकी होती.