दरभंगा रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी लष्कर-ए-तोयबाच्या दोघा आतंकवाद्यांना अटक

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

नवी देहली – बिहारच्या दरभंगा रेल्वे स्थानकामध्ये १७ जून या दिवशी पार्सल बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने लष्कर-ए-तोयबाच्या इम्रान मलिक आणि महंमद नासीर या दोघा आतंकवाद्यांना अटक केली आहे. या दोघांचे पाकशी संबंध असून तेथील त्यांच्या प्रमुखांच्या आदेशावरून ते येथे कारवाया करत होते. यातील नासीर वर्ष २०१२ मध्ये पाकमध्ये जाऊन आला होता. तेथे तो ‘केमिकल बॉम्ब’ बनवण्यास शिकला होता. नासीर आणि इम्रान यांनी तेलंगाणामधील सिकंदराबादहून दरभंगा येथे जाणार्‍या रेल्वे गाडीमध्ये हा पार्सल बॉम्ब ठेवला होता. देशात ठिकठिकाणी आतंकवादी कारवाया करण्याचा ते प्रयत्न करत होते.