स्कॉटलंड येथे ‘एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवा’त सादर करण्यात येणार हिंदु देवतांचे विडंबन असणारे नाटक !

अमेरिका आणि युनायटेड किंगडम येथील हिंदुत्वनिष्ठांनी घेतला तीव्र आक्षेप !

  • विदेशात हिंदु देवतांच्या होणार्‍या विडंबनाविरुद्ध अन्य देशांतील हिंदू आवाज उठवतात; पण हिंदूबहुल भारतातील सरकारी यंत्रणा आणि बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटना मात्र गप्प बसतात ! हे त्यांना लज्जास्पद !
  • भारत सरकारने स्कॉटलंडला  हिंदु देवतांचे विडंबन रोखण्यासाठी भाग पाडले पाहिजे आणि त्याला पुन्हा असे धाडस न करण्याची चेतावणी दिली पाहिजे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
  • जगात कुठेही अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यास त्या त्या देशांचे सरकार संबंधित देशांकडे लगेच आक्षेप नोंदवते, याउलट भारतात स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील आतापर्यंतच्या सरकारांनी एकदा तरी हिंदूंच्या श्रद्धस्थानांच्या अवमानाविषयी संबंधित देशांकडे असा आक्षेप नोंदवला आहे का ?

नेवाडा (अमेरिका) – स्कॉटलंड येथील एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवात हिंदु देवतांचे विडंबन करणारे ‘हिंदु टाइम्स’ नावाचे नाटक सादर करण्यात येणार आहे. हा महोत्सव २० आणि २१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होणार आहे. या नाटकामध्ये श्री ब्रह्मा, श्रीविष्णु आणि श्री लक्ष्मी देवी यांचे अत्यंत हीन पातळीवर विडंबन करण्यात आले असून हिंदु प्रथा-परंपरांची खिल्लीही उडवण्यात आली आहे. या नाटकावर ‘अमेरिका आणि युनायटेड किंगडम’ येथील हिंदूंनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

१. अमेरिकेतील ‘युनिव्हर्सल सोसायटी ऑफ हिंदुइज्म्’ या संघटनेचे अध्यक्ष श्री. राजन झेद यांनी एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या आयोजकांकडे या नाटकाचा प्रयोग रहित करण्याची मागणी केली आहे. झेद यांनी महोत्सवाला अर्थपुरवठा करणार्‍या संस्थांनाही याविषयी पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

२. युनायटेड किंगडम येथील ‘रीच इंडिया’ या संघटनेच्या नंदिनी सिंह यांनीही हे नाटक न दाखवण्याची मागणी केली आहे.

३. ‘ओव्हरसीज् फेंड्स ऑफ बीजेपी’ या संघटनेच्या कुलदीप शेखावत यांनीही या नाटकाचा खेळ रहित करण्याची विनंती आयोजकांकडे केली आहे.

४. ‘गार्डियन’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ‘हिंदु टाइम्स’ या नाटकामध्ये श्री ब्रह्मा, श्रीविष्णु आणि श्री लक्ष्मीमाता यांना भोगवादी दाखवण्यात आले असून त्यांच्या तोंडी अश्‍लील शब्द घालण्यात आले आहेत.