देहलीतील ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान’ रुग्णालयात आयुर्वेदीय औषधामुळे बरे झाले ६०० रुग्ण !

आयुर्वेदावर प्रश्‍न उपस्थित करणारे आणि त्याला कमी लेखणारे याविषयी बोलतील का ?

वाहन भाड्याने देतो असे सांगून अनेकांची फसवणूक !

पिंपरी-चिंचवडमधील एका टोळीने गाड्या भाड्याने लावतो, असे आमिष वाहनधारकांना दाखवले. मात्र या टोळीने गाड्या परस्पर विकल्या.

तमिळनाडूमध्ये एका गावामध्ये लोकांनी लस घ्यावी, यासाठी विनामूल्य बिर्याणी आणि भेटवस्तू देण्याची योजना

जनतेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठीही अशा प्रकारची योजना चालवावी लागते, यावरून जनता स्वतःच्या आरोग्याविषयीही किती निष्काळजी आहे, हे लक्षात येते !

महागाई वाढली असे वाटत असेल, तर खाणे, पिणे आदी सोडावे !

ज्या लोकांना महागाई राष्ट्रीय आपत्काळ वाटत आहे, त्यांनी खाणे, पिणे आदी सोडले पाहिजे. पेट्रोल, डिझेल यांचा वापर करणे सोडले पाहिजे. काँग्रेसला मत देणारे जर असे करतील, तर महागाई न्यून होईल, असे प्रत्युत्तर भाजपचे नेते  आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी काँग्रेसच्या टीकेवर दिले आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार योगऋषी रामदेवबाबा त्यांची मते व्यक्त करू शकतात ! – देहली उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार योगऋषी रामदेवबाबा त्यांची मते व्यक्त करू शकतात, असे सांगत देहली उच्च न्यायालयाने रामदेवबाबा यांना अ‍ॅलोपॅथीच्या विरोधात किंवा पतंजलिच्या ‘कोरोनिल’ किटच्या समर्थनार्थ बोलण्यापासून रोखण्यास नकार दिला आहे.

राहुल गांधी यांच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्याने त्यांचा आभारी आहे ! – आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांची उपरोधिक टीका

हिमंत सरमा यांनी सांगितलेला प्रसंग खरा असेल, तर काँग्रेसमध्ये गांधी घराण्याकडून पक्षाच्या नेत्यांचा किती मान राखला जातो, हे स्पष्ट होते !

कन्नड भाषेविषयी अपशब्द वापरणार्‍या गूगलकडून क्षमायाचना !

गूगल ऑनलाइन ‘सर्च इंजिन’ने कन्नड भाषेला ‘भारतातील सर्वांत घाणेरडी भाषा’ असे म्हटले होते. कर्नाटक सरकारकडून विरोध झाल्यानंतर गूगलने भारतियांची क्षमा मागितली आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम !

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णांच्या पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला गळती : कोणताही अनुचित प्रकार नाही !

सामान्य नागरिकांनाही आपत्कालीन प्रशिक्षणाची आवश्यकता आहे

विठ्ठल-रुक्मिणी यांच्या ३१ रूपातील प्रतिमा भाविकांना विक्रीसाठी उपलब्ध

‘वॉटरप्रूफ’ आणि उत्तम दर्जाच्या प्रतिमा १०० रुपयांपासून ते २ सहस्र रुपयांमध्ये भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.