श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा उपक्रम

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमा सिद्ध करून त्यांची विक्री करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. समितीच्या या उपक्रमाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक प्रतिमांची नोंदणी भाविकांनी केली आहे.
या उपक्रमाअंतर्गत श्री विठ्ठलाच्या ३१ रूपातील आणि पोषाखातील ७२ सहस्र प्रतिमा सिद्ध केल्या आहेत. ‘वॉटरप्रूफ’ आणि उत्तम दर्जाच्या या प्रतिमा १०० रुपयांपासून ते २ सहस्र रुपयांमध्ये भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रतिमा सिद्ध करण्यासाठी समितीने ‘व्हॉट लाईन’ ही अत्याधुनिक प्रिंटींग मशिनही खरेदी केली आहे.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
२५ जुलै : देवशयनी एकादशी
पंढरीचा महिमा !
विठ्ठल : इतिहास, मूर्तीशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र