भाजप नेत्याचे काँग्रेसला मत देणार्यांना आवाहन !
रायपूर (छत्तीसगड) – ज्या लोकांना महागाई राष्ट्रीय आपत्काळ वाटत आहे, त्यांनी खाणे, पिणे आदी सोडले पाहिजे. पेट्रोल, डिझेल यांचा वापर करणे सोडले पाहिजे. काँग्रेसला मत देणारे जर असे करतील, तर महागाई न्यून होईल, असे प्रत्युत्तर भाजपचे नेते आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी काँग्रेसच्या टीकेवर दिले आहे. छत्तीसगड राज्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन मरकाम यांनी देशातील वाढत्या महागाईला केंद्रातील मोदी सरकारला उत्तरदायी ठरवत तिला ‘राष्ट्रीय आपत्काळ’ म्हटले होते. त्यावर अग्रवाल यांनी उत्तर दिले. या उत्तरावर काँग्रेसने पुन्हा टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ता शैलेश नितीन त्रिवेदी यांनी म्हटले की, यावरून भाजपच्या नेत्यांची मानसिकता स्पष्ट होते. त्यांना होणारा त्रास लक्षात येतो.
“जिन्हें मंहगाई राष्ट्रीय आपदा लग रही है वह खाना-पीना छोड़ दें, पेट्रोल-डीजल का उपयोग बंद कर दें”
महंगाई के मुद्दे पर छत्तीसगढ़ के पूर्व BJP मंत्री बृजमोहन अग्रवाल का विवादित बयान #Chhattisgarh #महंगाई #PriceRise pic.twitter.com/vKu9hzaxp0
— News24 (@news24tvchannel) June 3, 2021