खड्ड्यांतून वाट काढत नागरिकांची खरेदी !

प्रमुख रस्त्यांवर मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम संथ गतीने चालू असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

राजा केळकर संग्रहालय आणि जर्मन सरकार यांच्यात सामंजस्य करार !

डॉ. दिनकर गंगाधर केळकर या एका व्यक्तीने संकलित केलेल्या दुर्मिळ वस्तूंचे संकलन हे राजा केळकर संग्रहालय याचे वैशिष्ट्य आहे.

३० सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथे पोलिसावर गुन्हा नोंद !

लाचखोर पोलिसांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

अवकाळीच्या वादळी वार्‍यासह झालेल्या मान्सूनमुळे डाळिंब आणि केळीच्या बागा भुईसपाट !

बेदाणा भिजल्याने शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. त्याचे तातडीने पंचनामे करून त्वरित हानीभरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

कोरोना केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करा ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

कोरोना केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणाली निश्‍चित करण्यात आली आहे.

सोलापूर शहरातील निर्बंध उठवण्यासाठी व्यापार्‍यांचे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन

‘आयुक्त चले जाव’, असा नारा व्यापार्‍यांनी दिला , पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना कह्यात घेऊन नंतर मुक्तता केली.

देशात सर्वाधिक मृत्यूदर इचलकरंजीत असतांना जाणीवपूर्वक इचलकरंजीकडे दुर्लक्ष ! – प्रकाश आवाडे, आमदार

आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन समोर आणलेली वस्तुस्थिती गंभीर आहे !

आषाढी यात्रेनिमित्त यंदाही विठुरायाचे ‘ऑनलाईन’ दर्शन

मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

अखिल भारतीय महासंघ, ‘ इन्फोसिसच्या स्पर्श फाऊंडेशन’ यांच्या वतीने गरजूंना अन्नधान्य साहित्य वाटप !

सौ. मोनिका करंदीकर आणि श्री. अतुल शहा यांच्या विशेष प्रयत्नांतून कलाकारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या पंचायतराजमधील आरक्षणावर गदा ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

राज्यातील प्रत्येक घटक सरकारवर नाराज आहे. याचे मूल्य सरकारला चुकवावे लागणार आहे.