आतंकवादाला समर्थन आणि आश्रय देणारे देश दोषी !

संयुक्त राष्ट्रांत भारताची पाकचे नाव न घेता टीका  !

जागतिक स्तरावर पाकचे नावही न घेणारा भारत कधीतरी पाकपुरस्कृत आतंकवाद आणि पाक यांना नष्ट करण्याचे धाडस दाखवू शकेल का ? भारताच्या अशा मुळमुळीत भूमिकेमुळे देशात गेली ३ दशके चालू असलेला जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, हीच वस्तूस्थिती आहे !

न्यूयॉर्क – भारत गेल्या काही दशकांपासून सीमेपलीकडून होणार्‍या आतंकवादाचा बळी ठरला आहे. आतंकवाद्यांचे समर्थन करणारे आणि त्यांना आश्रय देणारे देश यासाठी दोषी आहेत, अशी टीका भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकचे नाव न घेता केली.

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी असलेले राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती यांनी ही टीका केली. ‘कोविड-१९ च्या नंतरच्या परिस्थितीमध्ये आतंकवादाच्या आर्थिक पुरवठ्याला रोखणे’ या विषयावर झालेल्या चर्चेत ते बोलत होते. ‘आतंकवादाच्या संकटाला यशस्वीपणे नष्ट करण्यासाठी आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य मिळण्यापासून रोखणे महत्त्वाचे आहे’, असेही तिरुमूर्ती यांनी सांगितले.