कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकारामुळे नियमांचे काटेकोर पालन करा ! – जागतिक आरोग्य संघटना

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – प्रथम भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या ‘डेल्टा’ या प्रकाराचे जगातील जवळपास ८५ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या प्रकारांमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संसर्ग होणारा आहे. आपण सगळ्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. ट्रेड्रोस यांनी केले. ‘या विषाणुला रोखायचे असल्यास जगातील सर्वच देशांमध्ये समान पद्धतीने लसींचा पुरवठा व्हायला हवा’, असेही ते म्हणाले. भारतातील १० राज्यांमध्ये प्रामुख्याने ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जगभरातील नागरिकांनीही मास्क वापरणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.