सांगली, २६ जून – कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दरानुसार राज्यशासनाने जिल्ह्यांना १ ते ५ स्तरात विभागले आहे. यानुसार सांगली जिल्ह्यात तिसर्या स्तरासाठी निर्धारीत केलेले प्रतिबंधात्मक आदेश लागू होते. २४ जून या दिवशी संपणार्या आठवड्याचा सांगली जिल्ह्याचा कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दर हा १० टक्क्यांपेक्षा अधिक आणि २० टक्क्यांपेक्षा न्यून आहे. त्यामुळे कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दरानुसार सांगली जिल्ह्यात चौथ्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात येत आहेत, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. हे निर्बंध २८ जून ते ५ जुलै अखेर लागू असतील.
१. सर्व किराणा, भाजीपाला दुकान, फळ विक्रेते, दूध आणि दुग्ध पदार्थ, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारची खाद्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत चालू रहातील. कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत चालू असेल.
२. जिल्ह्यातील सर्व भाजीमंडई सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत चालू असेल. जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील सर्व आठवडा बाजार बंद रहातील.