महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची लूट करून विमा आस्थापनांना मालामाल केले ! – अनिल बोंडे, माजी कृषीमंत्री

डावीकडून माजी कृषिमंत्री अनिल बोंडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संभाजीनगर – केंद्रशासनाने पंतप्रधान विमा योजना लागू केली आहे. त्याची महाविकास आघाडी सरकारने कार्यवाही न करता खासगी विमा आस्थापना नेमून शेतकर्‍यांची लूट केली, तसेच विमा आस्थापनांना मालामाल केले आहे. कोरोनामुळे सरकार आजवर टिकून असून लाट ओसरताच शेतकरी भाजपच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी ११ जून या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील शेतकर्‍यांना विमा हानीभरपाई मिळत नाही. दर्जेदार बी बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. बाजारातील बनावट बियाणे आणि खतांवर कुणाचेही नियंत्रण नाही. पेरणीसाठी शेतकर्‍यांना कर्ज मिळत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोरोनामुळे कठोर निर्बंध आहेत. त्यामुळे सरकार टिकून आहे आणि श्‍वास घेत आहे.