वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथे कोरोनाचा संसर्ग अल्प होण्यासाठी मंत्रोपच्चारात प्राणवायू फेरी !

मंत्रोपच्चारात प्राणवायू फेरी काढणार्‍या संघटनांने अभिनंदन !

प्रतिकात्मक छायाचित्र

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) – कोरोनाचा संसर्ग अल्प होऊन वायूमंडळात प्राणवायू (ऑक्सिजन) वाढावा या उद्देशाने वैजापूरातील बजरंगदल आणि समाजसेवी युवक यांनी शहरातील अनेक भागांत मंत्रोच्चारात प्राणवायू फेरी काढली. वातावरण शुद्ध होऊन कोरोनाचा प्रभाव नष्ट व्हावा यांसाठी अग्निहोत्र धूपन फिरवण्यात आले. स्थानिक नागरिकांनी आपल्या परिसरात याचा वापर करावा, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा निर्मिती होईल, असे आवाहन या वेळी युवकांनी केले. तसेच गोवर्‍या, तूप, भीमसेनी कापूर, लवंग, विलायची, जायफळ, समिधा, वाद, पिंपळ, उंबर, आंबा, आघाडा, गुगळ, खैर, सौंदड आणि रुई या उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेल्या आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर या वेळी हवन सामुग्रीत करण्यात आला.