अभिनेते रणवीर सिंह यांच्याकडून ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या रंगमंचावर भूत दिसल्याचा दावा !

याविषयी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना काय म्हणायचे आहे ? आता ‘विज्ञानवादी’ कुणाला म्हणायचे  ? या घटनेला ‘अंधश्रद्धा’ ठरवून मोकळे होणार्‍यांना कि या सूक्ष्म शक्तींविषयी संशोधन करून त्यामागील सत्य जाणून घेणार्‍यांना ? हे जनतेला ठाऊक आहे.  

मुंबई – अभिनेते रणवीर सिंह यांना ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या रंगमंचावर (‘सेट’वर) भूत दिसल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले. ते भूत म्हणजे ‘बाजीराव पेशवे’ यांचा आत्मा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आधी मी कधीच आत्मा आणि भूत यांवर विश्‍वास ठेवत नव्हतो; मात्र तेव्हा मी अतिशय घाबरलेला होता. माझ्यासाठी चित्रीकरणाचे ते सर्वांत कठीण दिवस होते, असे रणवीर सिंह यांनी म्हटले आहे.

या वेळी सिंह पुढे म्हणाले,

१. माझ्या आजूबाजूला सतत कुणीतरी असल्याचे मला जाणवत होते. ‘ते बाजीराव असावेत’, असे मला वाटत होते.

२. मी सतत विचार करत होतो की, जर मला खरेच बाजीराव पेशवे यांचा आत्मा दिसला तर ? मला ठाऊक नाही की, मी असा विचार का करत होतो ?; पण काही दिवसांतच हे प्रत्यक्षात घडले. माझ्या कानात कुणीतरी ‘मी तोच (बाजीराव) आहे’, असे कुजबुजल्याचे मला जाणवले.

३. एक दिवस रंगमंचावर मला मोठा ‘टास्क’ देण्यात आला होता. हा ‘टास्क’ उत्तमपणे पार पडावा, यासाठी मी प्रार्थना करत होतो. रंगमंचावर एक काळ्या रंगाची भिंत होती. या भिंतीवर पांढरी धूळ जमा झाल्याने एक विशिष्ट आकृती सिद्ध झाली होती. तीच पगडी, तेच डोळे, मिश्या अगदी तोच रूबाब ! ती हुबेहुब बाजीराव पेशवे यांची आकृती होती. ही आकृती मी रंगमंचावरील अनेकांनी दाखवलीसुद्धा. यावर अनेकांनी ती आकृती बाजीराव पेशवे यांच्यासारखीच दिसत असल्याचे मान्य केले होते.

यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री बिपाशा बासू, अभिनेता इमरान हाश्मी आणि वरुण धवन यांनीही त्यांना चित्रीकरणाच्या वेळी असे विचित्र अनुभव आल्याचे सांगण्यात आले आहे.