पंढरपूरमध्ये राजकीय मेळावे चालतात मग पायी वारी का नको ? – ह.भ.प. अक्षय महाराज भोसले

सातारा, १२ जून (वार्ता.) – राज्या सरकारने पुन्हा एकदा पायी वारीवर बंधने घालून वारकरी संप्रदायाच्या भावनांचा अनादर केला आहे. पंढरपूरमध्ये राजकीय मेळावे चालतात, तर मग पायी वारी का नको ? असा प्रश्‍न वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी केला आहे.

ह.भ.प भोसले महाराज पुढे म्हणाले, ‘‘मागील वर्षी कोरोना हा आजार माणसांना नवीन होता. तीव्रता अधिक होती. दळणवळण बंदी होती. तरीही पंढरपूरसारख्या ठिकाणी सहस्रोंच्या उपस्थितीमध्ये राजकीय मेळावे झाले. निवडणुकांच्या कालावधीत अनेक मंत्री, विरोधी पक्षांचे नेते पंढरपूरमध्ये ठाण मांडून बसले होते. तेव्हा कोरोना कुठे होता ? आता वारीच्या वेळीच पंढरपूरमध्ये पुन्हा कोरोना वाढणार आहे का ? वारकरी शिस्तीचे पालन करणार आहेत. शासनाने कठोर निर्बंध घालावेत; मात्र सोहळा पायीच होऊ द्यावा.’’