कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवली जाते ! – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे – कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या घोषित केली असता त्यात १ लाखांचा फरक आहे. त्यामुळे राज्य सरकार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

मुंबईमध्ये नालेसफाईसाठी सहस्रो कोटी रुपये व्यय करूनही पावसात पाणी तुंबले. तसेच पावसाळ्याच्या पूर्वीची अनेक कामे अपूर्ण आहेत. मुख्यमंत्री १० मास मंत्रालयात जात नाहीत त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला दाखवून देतील, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.