गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच आगामी महापालिका निवडणूक लढवणार ! -प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुणे येथील कार्यक्रमात उपस्थित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे – महापालिकेची पुढील वर्षी होणारी निवडणूक खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पाटील यांनी पुण्याच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे खासदार गिरीश बापट यांची ताकद कमी झाल्याची चर्चा होती. यासंदर्भात पाटील यांना विचारले असता भाजपमध्ये कोणतेही गट नाहीत, असा दावा त्यांनी केला.

पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १० जून या दिवशी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कसबा विधानसभा मतदारसंघात अपंग आणि आजारी व्यक्तींना घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या उपक्रमाचे अन् अप्सरा चित्रपटगृह ते वखार महामंडळ या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांनी केले. या कार्यक्रमात शिवसेनेवर टीका करतांना शिवसेनेची अवस्था पिंजर्‍यातील वाघासारखी झाली असून आमची मैत्री जंगलातल्या वाघाची आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर मैत्री करण्याची हौस नाही, असेही पाटील यांनी सांगितले.