हिंदु राष्ट्राच्या कार्यात मी तुमच्या समवेत आहे ! – श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज, श्री आनंदाश्रम, हरिद्वार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. या कार्यात मी तुमच्या समवेत आहे. सर्व संत एकत्रित प्रयत्न करूया, असे प्रतिपादन श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज यांनी केले.

इतरांचा विचार करणारे आणि अल्प अहं असणारे पुणे येथील वैद्य मल्लिनाथ सदाशिव आलुर !

वैद्य मल्लिनाथ सदाशिव आलुर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी एका ऑनलाईन सत्संगात सांगितली. त्यांची मुलगी कु. मयुरा यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७४ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे’, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भोळ्या भावामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ भगवंतालाच पहाणार्‍या अन् अखंड भावावस्थेचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या पू. (श्रीमती) आनंदीबाई पाटीलआजी !

पू. पाटीलआजींच्या संवादामधून त्यांचे भगवंतमय झालेले भावविश्‍व आणि त्यांची अखंड भावावस्था यांचे दर्शन होते. या मुलाखतीचा उर्वरित भाग पाहूया.

गुरुमाऊली तुमचीच कृपा आहे सदासर्वकाळ आम्हावरी ।

कलियुगात जन्म घेऊनी आलो आम्ही सनातन संस्थेत ।
परात्पर गुरुमाऊली भेटली, धन्य झालो या जन्मात ॥
आम्ही कृष्णचरणांचे दास बनूनी मिळेल ती सेवा करू ।
हिंदु राष्ट्राचे सेतू बांधण्या रामाचे दासच आम्ही होऊ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अपार भाव असलेली आणि त्यांना आश्रम बांधण्यासाठी पैसे देता यावेत, यासाठी ते साठवणारी कु. सान्वी लोटलीकर !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सान्वी अमेय लोटलीकर ही एक आहे !

भगवंताची लीला अनुभवून कृतज्ञता व्यक्त करणे

‘मी काहीही खाल्ले, तरी त्याचे रक्त बनते, ही किमया कोण करू शकतो ? माझा प्रत्येक श्‍वास कुणामुळे अखंड चालू आहे ?यांसारख्या प्रश्‍नांची उत्तरे शोधल्यास भगवंताची लीला अनुभवता येऊ शकते. यांसाठी दिवसातून मी किती वेळा कृतज्ञता व्यक्त करतो ?’

शिकण्याची वृत्ती अन् सेवेची तीव्र तळमळ असल्याने मनापासून सेवा करणारी रामनाथी आश्रमातील कु. साधना पाटील !

आज साधिका कु. साधना पाटील हिचा चैत्र शुक्ल पक्ष चतुर्थीला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आश्रमातील सहसाधकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

विवेक म्हणजे काय ?

‘जगाकडे नामरूपात्मक दृष्टीने बघणे आणि त्याला कारणीभूत असणारे स्वयं-प्रकाशमान अधिष्ठान विसरणे, म्हणजेच ‘अविवेक’. या वृत्तीमध्ये मोडणारे सर्व कार्यकारण भावज्ञान-विरहित भासणे होय.