हिंदु राष्ट्राच्या कार्यात मी तुमच्या समवेत आहे ! – श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज, श्री आनंदाश्रम, हरिद्वार

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज यांना कुंभमहिमा विशेषांक भेट देतांना डावीकडे श्री. सुनील घनवट

हरिद्वार, १५ एप्रिल (वार्ता.) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. या कार्यात मी तुमच्या समवेत आहे. सर्व संत एकत्रित प्रयत्न करूया, असे प्रतिपादन खडखडी भूपतवाला येथील श्री आनंदाश्रम, दक्षिणी भागचे अध्यक्ष श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘हिंदु राष्ट्र्र संपर्क अभियाना’च्या अंतर्गत श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी वरील मार्गदर्शन केले.

या वेळी श्री. घनवट यांनी महाराजांना राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, संतांवर होणारी आक्रमणे, लव्ह जिहाद, हिंदु राष्ट्राची स्थापना आदींविषयी समिती करत असलेल्या कार्याविषयीची माहिती दिली. या वेळी महाराजांना कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृति समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले.