सदासर्वकाळ साधकांवर कृपावर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
कलियुगात जन्म घेऊनी आलो आम्ही सनातन संस्थेत ।
परात्पर गुरुमाऊली भेटली, धन्य झालो या जन्मात ॥ १ ॥
आम्ही कृष्णचरणांचे दास बनूनी मिळेल ती सेवा करू ।
हिंदु राष्ट्राचे सेतू बांधण्या रामाचे दासच आम्ही होऊ ॥ २ ॥
गुरुमाऊलींनी शिकवली हनुमंतासम भक्ती अन् कृष्णासम प्रीती ।
हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्या ते देह झिजविती हो किती ॥ ३ ॥
व्हावी ‘स्व’स्वरूपाची ओळख जन्म न जावो साधकांचा वाया ।
गुरुमाऊली आम्हावरी राहो आपुली सदा छाया ॥ ४ ॥
सेवेचा ध्यास लागो, कृतज्ञ राहो साधक तव चरणी अविरत ।
कृपा तुमची नसती, तर आम्ही सापडलो असतो या दुष्ट चक्रात ॥ ५ ॥
गुरुमाऊली तुमचीच कृपा आहे सदासर्वकाळ आम्हावरी ।
चैतन्याची बरसात होवो आम्हावर जन्मभरी ॥ ६ ॥
– सौ. अंजली बाळासाहेब विभूते, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.३.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |