सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एन्.आय्.ए. कोठडी ३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

विद्यापिठात असलेली मराठेशाहीपासूनची दुर्मिळ चित्रे धूळ-बुरशीत खितपत !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे अक्षम्य दुर्लक्ष

सोलापूर येथील मार्कंडेय रुग्णालयात ऑक्सिजन टाकीचा स्फोट !

येथील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात एका ऑक्सिजन टाकीचा २४ मार्चच्या रात्री स्फोट झाला. अग्नीशमन दलाने तातडीने ही आग आटोक्यात आणली. स्फोटादरम्यान दोघांचा मृत्यू; मात्र रुग्णालयाने फेटाळला कुटुंबियांचा आरोप.

कुंभमेळा भारताची सांस्कृतिक महानता दर्शवतो ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की, विशिष्ट तिथी, ग्रहस्थिती आणि नक्षत्र यांच्या योगावर आलेल्या कुंभपर्वाच्या वेळी ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा प्रभाव प्रयाग, हरिद्वार, उज्जैन अन् नाशिक येथील गंगा नदीसह अन्य नद्यांमध्ये दिसून आला आहे.

विशाळगडाच्या विषयाच्या संदर्भात लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू !

विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू. यानंतर २ मासांच्या कालावधीत त्यावर काहीच हालचाल न झाल्यास पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करू,..

अरबी समुद्रातील ३ नौकांतून अमली पदार्थांसह मोठा शस्त्रसाठा कह्यात; ३ नौकांसह १९ मासेमारांना अटक

तटरक्षक दलाने अरबी समुद्रातील ३ संशयित नौकांवर केलेल्या कारवाईत ४ सहस्र ९०० कोटी रुपयांचा १ सहस्र ६०० किलो अमली पदार्थांचा साठा, तसेच एके ४७ च्या ५ रायफली आणि १ सहस्र जिवंत काडतुसे कह्यात घेतली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची दुर्ग मावळा प्रतिष्ठानची मागणी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भावी पिढी स्वाभिमानी, सामर्थ्यवान, बलशाली, कुशाग्र, अष्टावधानी अशा छत्रपती संभाजी महाराजांसारखी होईल.

‘फोन टॅपिंग’मधील सहभागाविषयी देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी व्हावी !  – जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

अधिकारी, आमदार यांच्या ‘फोन टॅपिंग’मध्ये सहभागी असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

सनातन पर्वांना अवश्य साजरे करा !

आपल्याला सनातन संस्कृतीशी तोडून धर्मांतर करण्याकडे प्रेरित करण्यात येत आहे. आता पृथ्वीवरील सनातन भाव स्वीकार करावाच लागेल.