
सांगली – अधिकारी, आमदार यांच्या ‘फोन टॅपिंग’मध्ये सहभागी असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी उद्योजक अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन यांची हत्या या विषयांना विरोधक बगल देत असून ते महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही या वेळी केला. जयंत पाटील म्हणाले, ‘‘फडणवीस यांनी अधिकार्यांमधील संभाषणाचे ध्वनीमुद्रण मिळवले आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. गुप्तवार्ता विभागाच्या रश्मी शुक्ला यांनी कुणाच्या अनुमतीने अशा प्रकारे ‘फोन टॅपिंग’ केले. पोलिसांचे अनेक विभाग भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणेच वागत होते, हे आता उघड होत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे सारे उघड होईल. अनेक आमदार आणि अधिकारी यांचे असे टॅपिंग केले असण्याची शक्यता आहे.’’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !