जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांचे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीला आश्वासन

वारणानगर (जिल्हा कोल्हापूर), २५ मार्च (वार्ता.) – विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू. यानंतर २ मासांच्या कालावधीत त्यावर काहीच हालचाल न झाल्यास पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करू, असे आश्वासन पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातील आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष श्री. विनय कोरे यांनी दिले. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी श्री. कोरे यांना विशाळगडाच्या एकूण परिस्थितीविषयी अवगत करून निवेदन दिले. त्या वेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.
या वेळी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री, श्री. शिवानंद स्वामी, तसेच अन्य उपस्थित होते. या वेळी श्री. कोरे यांनी ‘विशाळगड येथील मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यासाठी आमदार निधीचा वापर करू’, असेही सांगितले.
प्रश्नपत्रिका फुटीचे सरकार दायित्व घेते आणि ते निश्चितही करते ! – सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त
मराठी भाषा जतन आणि संवर्धन यांसाठी प्रभावी कृती आराखडा राबवा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद