सनातन पर्वांना अवश्य साजरे करा !

‘भारतीय संस्कृतीला युगानुयुगाचा वारसा लाभलेला असून ती समृद्ध आणि परिपूर्ण आहे. या सनातन संस्कृतीमध्ये अमृतासम भरलेले कलश आधीपासूनच होते आणि आताही आहेत; परंतु भारतीय चैतन्यमय अशी संस्कृती सोडून भोगवादी अन् रज-तमप्रधान संस्कृतीच्या मागे लागले आहेत. हे अमृत सोडून चिखलामागे धावण्यासारखे आहे.

सौजन्य : www.divyayug.com

१. आपल्याकडे जर मातृनवमी होती, तर मातृनवमीला आम्ही मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकत नव्हतो का ?; पण येथे ‘मदर्स डे’ आणला गेला.

२. आमच्याकडे कौमुदी महोत्सव आणि मधुमास होता. या मासामध्ये आम्ही आमच्या आप्तांविषयी किंवा मित्रांविषयी प्रेम व्यक्त करू शकत होतो; पण येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ आणला गेला. त्यातून तरुण पिढीला नैतिकता मिळण्याऐवजी अनैतिकताच मिळाली.

३. आपल्या देशात अंधाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणार्‍या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनादी काळापासून गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येतो. मग आम्ही ‘टिचर्स डे’ (शिक्षकदिन) साजरा करू लागलो. त्यामुळे आम्ही गुरुकृपेपासून वंचित झालो.

४. आम्हाला आरोग्य संपन्न करून दीर्घायुष्य प्रदान करणारी धन्वन्तरीची ‘धन्वन्तरि जयंती’ आहे, तर ‘डॉक्टर्स डे’ का आणला ?

५. जर विश्‍वकर्मा जयंती असतांना ‘इंजिनिअर्स डे’ आणि ‘श्रम दिवस’ का आणला गेला ?

६. पुत्राच्या दीर्घायुसाठी आणि समृद्धीसाठी ‘संतान सप्तमी’ अन् अहोई असतांना ‘चिल्ड्रन डे’ का आणला गेला ?

७. आमच्याकडे नवरात्रीमध्ये ९ दिवस देवीची आराधना करून कन्याभोजन साजरे करण्याची पद्धत आहे. मग ‘महिला दिवस’ का आणला ?

८. भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन हा बहीण आणि भाऊ यांच्यातील जिव्हाळा वृद्धींगत करणारा सण आहे, तर मग ‘सिस्टर डे’ कशासाठी ? या दिवशी बहिणीला शुभेच्छा दिल्याने कोणती आपुलकी निर्माण होणार आहे ?

९. सहस्रो वर्षांपासून भारतात भाऊबीज साजरी केली जाते, तर ‘ब्रदर्स डे’ का ? भाऊ या शब्दातील प्रेम ‘ब्रदर’ या शब्दाने व्यक्त होऊ शकते का ?

१०. भारतात मोठ्या प्रमाणात करवा चौथ व्रत केले जाते. या दिवशी हिंदु महिला त्यांच्या पतीला दीर्घायु आणि चांगले स्वास्थ मिळावे, यांसाठी मनोकामना करतात. मग ‘हजबंड डे’ कशासाठी ?

११. आवळा नवमी, तुलसी विवाह साजरा करणारे आणि नित्य पिंपळाचे पूजन करणारे सनातन भारतीय ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी संतांची शिकवणच आचरणात आणतात ना ? तरी आम्हाला ‘पर्यावरण दिना’ची आवश्यकता आहे का ?

१२. एवढेच नाही, तर नारद जयंती, म्हणजे ब्रह्मांडीय पत्रकारिता दिवस आहे.

१३. पितृपक्ष ७ पिढीपर्यंतच्या पूर्वजांचा पितृपर्व आहे.

आपल्याला सनातन संस्कृतीशी तोडून धर्मांतर करण्याकडे प्रेरित करण्यात येत आहे. आता पृथ्वीवरील सनातन भाव स्वीकार करावाच लागेल. त्यासाठी सनातन पर्वांना अवश्य साजरे करा !

(संदर्भ : व्हॉट्सअ‍ॅप)