श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीस अभ्यंगस्नान

छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस अभ्यंगस्नान घातल्यानंतर एकत्र जमलेले धारकरी

कोल्हापूर, १७ नोव्हेंबर – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूरच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे दीपावली पाडव्याच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस अभ्यंगस्नान घालण्यात आले. मूर्तीस सुगंधी उटणे लावून दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र यांचे सामूहिक पठण करण्यात आले. या वेळी मूर्ती परिसरातील स्वच्छता करण्यात आली. या प्रसंगी शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, सर्वश्री दिनेश बामणे, अनिकेत डवरी, गौरव देशिंगकर, ओंकार शिरोडकर, प्रथमेश शिंदे यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.