|
नवी देहली – काँग्रेसचे माजी खासदार शाहिद सिद्दीकी यांनी दिवाळीच्या दिवशी पहाटे फटाके फोडण्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले, ‘पहाटे ४ वाजता कोणत्या प्रकारचे लोक फटाके फोडतात ? जर निर्णय योग्यरित्या लागू केला जात नाही, तर फटाक्यांवर बंदी घालून काय उपयोग ?’, असे प्रश्न त्यांनी विचारले. त्यांनी पुढे असेही म्हटले की, देहली यापूर्वीच विषारी नरक बनली होती आणि आता दिवाळीच्या दुसर्या दिवशी सकाळी मोठ्या संख्येने लोकांच्या मृत्यूचा सापळा बनणार.
Hahahaha, for him loud crackers at 4.30 in the morning defines Hinduism.
I love, respect and understand Satanan Dharma from reading Swami Vivekananda, Dr Radhakrishna. But his Dharma comes from hatred of Islam & he is ready to burn his own home for that. What a pity. https://t.co/XWr3gkliYh— shahid siddiqui (@shahid_siddiqui) November 15, 2020
१. सिद्दीकी यांच्या या ट्वीटचा सामाजिक माध्यमांतून अनेकांनी विरोध केला. यात त्यांनी म्हटले की, सकाळी सकाळी अजानचा आवाज येतो, त्यामुळे अनेकांची तंद्री भंग होत नाही का ?
२. आदित्य भारद्वाज नावाच्या व्यक्तीने विचारले, ‘असे कोण लोक आहेत जे ‘धर्मनिरेपक्ष’ भारताच्या नावाखाली अजानद्वारे लोकांना दिवसांतून अनेकदा त्रास देत आहेत ?’