कानपूर येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदू, हिंदुत्वनिष्ठ, साधू आणि संत यांच्या सर्वाधिक हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने येथे धर्मांधांवर वचक निर्माण करावा, असे हिंदूंना वाटते !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील जाजमऊ भागात क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी एका हिंदु तरुणाला अमानुष मारहाण करत त्याला ठार केल्याची घटना नुकतीच घडली.

पिंटू निषाद हा २५ वर्षीय तरुण त्याचा मोठा भाऊ आणि मित्र यांच्या समवेत जात असतांना वाटेत त्यांनी पाणी विकत घेतले. पाणी पित असतांना त्याचे काही शिंतोडे अमन नावाच्या तरुणावर उडाले. त्यातून त्यांचा वाद झाला आणि अमनने त्याच्या साथीदारांसह पिंटूला अमानुष मारहाण केली. यात घायाळ झालेल्या पिंटूला रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला, तसेच येथे धार्मिक तणाव निर्माण हाऊ नये; म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला. या घटनेची माहिती मिळाल्यावर सरकारकडून पिंटूच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांचे साहाय्य करण्यासह आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.