कोल्हापूर येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर शिवसेनेच्या वतीने प्रतिमा पूजन आणि अभिवादन !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतांना शिवसैनिक

कोल्हापूर – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहर शिवसेनेच्या वतीने प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले. या वेळी युवानेते श्री. ऋतुराज क्षीरसागर, सर्वश्री श्री. किशोर घाडगे, रघुनाथ टीपुगडे, उदय भोसले, रणजित जाधव, चेतन शिंदे, निलेश हंकारे, दिपक चव्हाण, सुरेश कदम, सचिन भोळे, कपिल सरनाईक यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.