फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍या धर्मांध विद्यार्थ्यास अटक

महंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्राचे प्रकरण

शाळेत शिकतांनाही शिरच्छेदासारख्या धमक्या देणारे धर्मांध कधीतरी शांतीचे पाईक होऊ शकतात का ? अशा कट्टरतावादाच्या विरोधात आता संपूर्ण जगाने एकत्र आले पाहिजे !

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समध्ये एका १४ वर्षांच्या धर्मांध विद्यार्थ्याने त्यांच्या इतिहास आणि भूगोल विषय शिकवणार्‍या शिक्षकाला शिरच्छेद करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. काही आठवड्यांपूर्वी फ्रान्समध्येच ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकातील महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रे दाखवल्यामुळे एका धर्मांध विद्यार्थ्याकडून सॅम्युअल पॅटी या शिक्षकाची हत्या केली होती. ‘तशीच तुमचीही हत्या करू’, अशी धमकी या १४ वर्षांच्या मुलाने या शिक्षकाला दिली.

नागरिक शास्त्राचा विषय शिकवला जात असतांना त्याने ही धमकी दिली. या विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. त्याला त्याच्या बेशिस्त वागण्यामुळे यापूर्वी २ वेळा शाळेतून काढण्यात आले होते.