‘ॐ’कार, त्याच्या मात्रा आणि ब्रह्माचे पाद
‘ॐ’ ह्या एका अक्षराने, ‘ब्रह्म’ ह्या दोन अक्षरांनी, ‘प्रणव’ ह्या तीन अक्षरांनी एकच ‘ब्रह्म’ सांगितले जाते. साधारणत: ‘अ’ ‘उ’ ‘म’ ह्या प्रत्येकी एक मात्रा आणि चंद्रकोरीवर बिंदू ही अर्ध मात्रा; अशा प्रकारे ओंकाराच्या साडेतीन मात्रा मानल्या जातात.