विद्यापिठांच्या परीक्षांविषयी लवकर निर्णय घ्या ! – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यापिठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याविषयी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी सूचना राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. या परीक्षांविषयी निर्णय घेण्याचा अधिकार नसतांना केलेल्या हस्तक्षेपाविषयी उच्च शिक्षणमंत्र्यांना समज द्यावी, असेही कोश्यारी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात मालवाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा उपयोग होणार !

राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतुकीची कालमर्यादा संपलेल्या बसचे मालवाहतूक बसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. पहिली मालवाहतूक बस २ दिवसांत उपलब्ध होणार आहे. राज्यातील मालवाहतुकीची विस्कटलेली घडी सावरण्यासह तोट्यात चालणार्‍या परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.

शासनाकडून कापूस खरेदी व्हावी, यासाठी यवतमाळ येथे आंदोलन

शासनाने कापूस खरेदीसाठी आवश्यक असलेली नोंदणी बंद केल्यामुळे शेतकर्‍यांच्या घरात लाखो क्विंटल कापूस पडून आहे. खरीप हंगाम जवळ आला असतांनाही दळणवळण बंदीच्या नावाखाली कापसाची अत्यल्प खरेदी करण्यात येत आहे, असा आरोप करत याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी-वारकरी संघटनेच्या वतीने प्रतिकात्मक स्वरूपात थोडासा कापूस जाळून आंदोलन करण्यात आले.

लाच मागितल्याप्रकरणी शहापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकार्‍यासह चौघेजण कह्यात

तक्रारदाराच्या विरुद्ध नोंद असलेल्या गुन्ह्यात जामीन देण्यासाठी सहकार्य करणे, या गुन्ह्यातून मुक्तता करणे, तसेच तक्रारदाराचे गोठलेले अधिकोषाचे खाते पूर्ववत् चालू करून देणे यांसाठी शहापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती.

मृतदेहाची अदलाबदल झाल्याप्रकरणी ‘वॉर्डबॉय’सह अन्य एकावर गुन्हा नोंद

मृतदेहाची अदलाबदल होऊन २ धर्मियांच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील ‘वॉर्डबॉय’ आणि अन्य एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कर्मचार्‍याने शवागारातून महिलेच्या मृतदेहाऐवजी एका तरुणाचा मृतदेह नातेवाइकांना दिला.

नागपूर येथील नियमांचे पालन न करणार्‍या दुकानदारांवर कारवाई होणार

दळणवळण बंदीनंतर १७ मे पासून उघडलेल्या काही दुकानांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे अशा दुकानदारांवर कारवाई करण्याची चेतावणी येथील महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

नागपूर येथे लाच घेतल्याप्रकरणी आयुर्वेद महाविद्यालयातील अधिकार्‍याला अटक

स्वच्छता कामगार पदावर नियुक्तीपत्र देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासकीय अधिकारी बंडू देसाई पवार (वय ५५ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० मे या दिवशी रंगेहात पकडले.

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादुका रायगड येथून डोक्यावरून नेण्यात येणार

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादुका रायगडावरील समाधीस्थानाहून पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी म्हणजे ९ जून या दिवशी सकाळी ८ वाजता महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान होणार आहे.

२२ मे या दिवशी महाराष्ट्रात आढळले २ सहस्र ९४० रुग्ण

२२ मे या दिवशी राज्यातील ६३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर २ सहस्र ९४० नवीन रुग्ण आढळले. राज्यात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याचा हा उच्चांक आहे.

ठाणे येथे हुतात्मा पोलीस कर्मचार्‍याच्या पोलीस पत्नीचा कोरोनाने मृत्यू

येथील पोलीस दलातील कोरोनाबाधित ४५ वर्षीय महिला पोलीस कर्मचार्‍याचा खासगी रुग्णालयात उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. २७ मार्चपासून वैद्यकीय रजेवर असलेल्या या महिला पोलीस कर्मचार्‍यास मूत्रपिंडाचा आजार होता. त्यांचे पती राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत होते.