‘अतिथी’ म्हणून नव्हे, तर ‘एक कुटुंबीय’ म्हणून सर्वांशी मिळून मिसळून रहाणारे सद्गुरु सिरियाक वाले यांची ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले पुण्यातील साधक श्री. प्रताप कापडीया यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. सिरीयाकदादा संत झाले आणि आता ते सद्गुरुही झाले. त्यानंतरही त्यांचे प्रेम इतके आहे की, ते आमच्यात मिसळून रहातात. त्यांचे कोणतेच वेगळेपण ठेवत नाहीत. ‘आम्हाला संतांना एवढ्या जवळून पहाता आले, यासाठी कृतज्ञता आणि ‘त्यांच्यासारखे गुण आमच्यात यावेत’, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !

‘ॐ’कार, त्याच्या मात्रा आणि ब्रह्माचे पाद

‘ॐ’ ह्या एका अक्षराने, ‘ब्रह्म’ ह्या दोन अक्षरांनी, ‘प्रणव’ ह्या तीन अक्षरांनी एकच ‘ब्रह्म’ सांगितले जाते. साधारणत: ‘अ’ ‘उ’ ‘म’ ह्या प्रत्येकी एक मात्रा आणि चंद्रकोरीवर बिंदू ही अर्ध मात्रा; अशा प्रकारे ओंकाराच्या साडेतीन मात्रा मानल्या जातात.