महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी २ सहस्रांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले

२० मे या दिवशी महाराष्ट्रात कोरोनामुळे ६५ नागरिकांचा मृत्यू झाला असून नवीन २ सहस्र २५० रुग्ण आढळले. राज्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे २ सहस्रांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच दुसर्‍या बाजूला बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. २० मे या दिवशी बरे झालेल्या ६७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

अनुमती न घेता मुंबईत रहाणार्‍या नांदेड येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना नोटीस

दळणवळण बंदीच्या काळात अनुमती न घेता मुंबई येथे रहाणारे नांदेड येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याविषयी चौकशी चालू असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

पुण्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास प्रारंभ

दळणवळण बंदीच्या चौथ्या टप्प्यात महापालिका प्रशासनाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, सिंहगड रस्ता आदी परिसरांतील दुकाने उघडण्यास अनुमती दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर २० मे या दिवशी अनेक भागांतील दुकाने उघडण्यात आली.

(म्हणे) ‘भारतीय विषाणू चीन आणि इटली यांच्यापेक्षा अधिक घातक !’

चीनचे बटीक बनलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांची जीभ पुन्हा घसरली ! चीनच्या विषाणूने नेपाळला कशा प्रकारे गिळंकृत केले आहे, तेच या विधानावरून दिसून येते ! नेपाळमधील असे भारतद्वेषाचे विषाणू नष्ट करण्यासाठी आता भारताने पुढाकार घेतला पाहिजे !

नेपाळ आणि भारत यांच्यातील सीमावाद, हा त्यांचा अंतर्गत प्रश्‍न ! – चीन

असे सांगून चीन मी या वादामध्ये नाही असे जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत असला, तरी या वादामागे चीनचाच हात आहे, हे जगालाही ठाऊक आहे !

चीनने पॅनगाँग तलावाच्या भागामध्ये सैनिक आणि नौका यांची संख्या वाढवली

काही दिवसांपूर्वी लडाखच्या पॅनगाँग तलावाजवळ भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये झटापटी झाली होती. आता याच भागात चीनने गस्तीच्या नावाखाली सैनिक आणि नौका यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे येथील तणावामध्ये भर पडली आहे.

१ जूनपासून प्रतिदिन २०० विशेष रेल्वेगाड्या चालू करणार ! – रेल्वेमंत्र्यांची घोषणा

देशभरातील स्थलांतरित कामागारांसाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक रेल्वेगाडी आणि राजधानी विशेष रेल्वेगाडी चालू केल्यानंतर १ जूनपासून देशभरात प्रतिदिन २०० विशेष गाड्या चालू करण्यात येणार आहेत.

२५ मे पासून देशांतर्गत विमानसेवा चालू होणार

देशांतर्गत विमानसेवा २५ मे पासून चालू केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी ट्वीट करून केली. दळणवळण बंदीमुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली होती.

होसूर (बेळगाव) येथील श्री गुरु मडिवाळेश्‍वर मठाचे स्वामी गंगाधर यांच्यावर प्राणघातक आक्रमण

गेल्या काही दिवसांत हिंदु साधू-संत-महंत यांच्यावर वाढती प्राणघातक आक्रमणे हा चिंतेचा विषय आहे. यावर शासनाने गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक !

‘अंफान’ महाचक्रीवादळामुळे ४ जणांचा मृत्यू

‘अंफान’ हे महाचक्रीवादळ २० मेच्या सायंकाळी बंगाल आणि ओडिशा राज्यांच्या समुद्रकिनार्‍यांवर धडकल्याने आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.