रामजन्मभूमीमध्ये सपाटीकरणाच्या वेळी सापडल्या मूर्ती आणि शिवलिंग !  

येथील रामजन्मभूमी परिसरात राममंदिराच्या बांधकामानिमित्त सपाटीकरणाचे काम चालू आहे. या कामाच्या वेळी भूमीमध्ये विविध देवतांच्या खंडित मूर्ती, वेगवेगळ्या आकृत्यांचे आणि कलाकुसरीचे दगड, ७ ब्लॅक टच स्तंभ, लाल वाळूच्या दगडांचे ६ स्तंभ, पुष्पकलश आणि ५ फुटांच्या आकाराचे नक्षीयुक्त शिवलिंग सापडले आहे.

ईदच्या नमाजपठणासाठी मशिदी आणि इदगाह मैदाने उघडण्याची मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाली काढली

दळणवळण बंदीच्या काळात हिंदूंनी त्यांच्या सणांच्या दिवशी मंदिरे उघडण्याची मागणी केली नाही; मात्र काही जण मशिदी उघडण्याची मागणी करून आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत, हे परत परत दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे !

‘सत्पात्री दान’ तसेच दान आणि अर्पण यांचे महत्त्व अन् त्यांतील भेद

अनेक दानशूर सामाजिक कर्तव्याच्या भ्रमात असतात आणि ते काही स्वयंसेवी संस्थांना (एन्.जी.ओ. ना) दान देतात. दान देतांना दान देणार्‍यांनी ‘आपला पैसा योग्य कार्यासाठी आणि योग्य मार्गाने व्यय होतो ना ?’, याची निश्‍चिती करणे आवश्यक आहे.

‘टिक-टॉक’वर बंदी घाला !

टिक-टॉक’ या चिनी ‘अ‍ॅप’वर बंदी घालण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वर्ष २०१६ मध्ये ‘बाईट डान्स टेक्नॉलॉजी’ या चिनी आस्थापनाने हे ‘अ‍ॅप’ बाजारात आणले. अल्पावधीतच ते जगभर लोेकप्रिय झाले.

अभिनेते अरुण गोविल यांना श्रीरामाच्या वेशभूषेत स्टुडियोमध्ये परेड करण्याचा बीबीसीचा प्रस्ताव निर्माते रामानंद सागर यांनी फेटाळला होता ! – प्रेम सागर यांचा दावा

बीबीसीचा आतापर्यंतचा इतिहास हा हिंदुद्वेषीच आहे. त्यामुळे श्रीरामाच्या वेशभूषेतील कलाकाराला अशा प्रकारे परेड करायला लावून बीबीसीला हिंदूंच्या देवतांची खिल्ली उडवायची होती. अशा मोठ्या विदेशी वाहिन्याच्या दबावाला बळी न पडणारे रामानंद सागर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे !

अपघातामुळे कोमामध्ये गेलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना ७५ लाख रुपये देण्याचा देहली उच्च न्यायालयाचा देहली पोलिसांना आदेश

वर्ष २०१५ मध्ये देहली पोलिसांनी पंजाबी बाग येथे लावलेल्या बॅरिकेडमुळे (अडथळ्यामुळे) रात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघात धीरज नावाचा एक तरुण कोमामध्ये गेला होता. या प्रकरणी देहली उच्च न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला होता.

मंंदिर सरकारीकरण : देवनिधीची लूट करणारी हिंदुद्वेषी व्यवस्था !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात विविध स्तरांवर अभियानही राबवत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्व मंदिरांचा कारभार भक्तांकडे असेल !

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाने जीव लवकर पूर्णत्वाला जातो !

साधनेचे अनेक मार्ग आहेत. आपण ‘ॐ’कार साधना केली, ध्यानधारणा केली, अलिप्त राहून अज्ञातात जाऊन साधना केली किंवा शक्तीपातयोगानुसार साधना केली, तरी या साधना पूर्णत्वाला गेल्या, तरच त्या जिवाला मोक्षप्राप्ती मिळते.