भारत सैनिकांच्या हौतात्म्याचा सूड उगवू शकतो, या भीतीने पाकच्या लढाऊ विमानांची आकाशात गस्त

नवी देहली – काश्मीरच्या हंदवाडा येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात भारताचे कर्नल, मेजर आणि अन्य सैनिक हुतात्मा झाल्याचा सूड भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून घेऊ शकतो, या भीतीने पाकने त्याच्या लढाऊ विमानांद्वारे आकाशात गस्त घालण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वीच पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही ट्वीट करून काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणासाठी भारत पाकला उत्तरदायी ठरवून कारवाई करू शकतो, अशी भीती व्यक्त करून आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले होते.