‘ई-शिक्षण’ नकोसे वाटू नये !
कोरोनाच्या संकटामुळे साधारण मार्चच्या तिसर्या आठवड्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. या एक-दोन मासांच्या कालावधीत शिक्षणक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर एक पालट घडतांना दिसून येत आहे, तो म्हणजे ‘ई-एज्युकेशन’चा (संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण देण्याचा उपक्रम) !