शिर्डी संस्थानने मुदत ठेवींतून कर्मचार्‍यांचे वेतन दिले, तर तिरुपती देवस्थानही त्याच विचारात !

दळणवळण बंदीमुळे मंदिरांत अर्पण येणे बंद झाल्याचा परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सर्वच पैसा संबंधित सरकारे घेऊन जात असल्याने मंदिरांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !

‘शरीयत’चा मनमानीपणा रोखा !

जर शरीयतनुसार न्यायनिवाड्याची प्रक्रिया चालू करायची असेल, तर ‘भारतात हिंदु धर्मानुसारही न्यायनिवाडा केला जावा’, अशी मागणी हिंदुनी उद्या केली तर . . . ! सर्वांना समान वागणूक आणि अचूक न्याय मिळवून देणारी हिंदु धर्मातील न्यायप्रक्रिया म्हणूनच खर्‍या अर्थाने आदर्श मानली जाते. तिचा अवलंब होणे ही सध्याच्या काळाची आवश्यकता आहे.

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंदिरांचे सोने घेण्याच्या मागणीस धर्माभिमानी हिंदूंचा ट्विटरवरून विरोध

त्यांच्या विरोधात धर्माभिमानी हिंदूंनी ट्विटरच्या माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धर्माभिमानी हिंदूंनी   #CongressEyesTemplesGold हा हॅशटॅग बनवून त्याद्वारे विरोध चालू केला आहे. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ८ व्या स्थानावर होता आणि त्यावर ३५ सहस्रांहून अधिक ट्वीट करण्यात आले. यात अनेकांनी काँग्रेसवर टीका केली.

सनातनचे साधक पुरोहित सिद्धेश करंदीकर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

मे २०१९ मध्ये झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातनचे साधक पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.