‘कोव्हिड १९ अँटिबॉडी’ शोधणारे पहिले स्वदेशी किट सिद्ध

पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा स्तुत्य प्रयत्न

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

पुणे – येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने कोव्हिड १९ अँटिबॉडीचा शोध घेणारे पहिले स्वदेशी किट सिद्ध केले आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने मिळवलेले हे यशच म्हणावे लागेल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी १० मे या दिवशी माहिती दिली. अधिक लोकसंख्या असलेल्या परिसरात कोरोना विषाणूच्या संसर्गावर पाळत ठेवण्यात आणि कोरोना संक्रमितांची ओळख पटवण्यात हे किट महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. अडीच घंट्यांंमध्ये ९० चाचण्या घेण्याची या किटची क्षमता आहे, असेही हर्षवर्धन यांनी सांगितले.