उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी पुढीलप्रमाणे घ्या !

एप्रिल आणि मे या दोन मासांचा काळ म्हणजे ग्रीष्म ऋतू. या ऋतूत वातावरण रूक्ष आणि उष्ण असते. शरिराची शक्ती, तसेच पचनशक्तीही न्यून झालेली असते. या काळात नाकातून रक्तस्राव होणे (घुळणा फुटणे), उन्हाळे लागणे (लघवीला जळजळ होणे), घामोळे येणे, उष्माघात, डोळे येणे आदी विकार होतात.