१९ मे या दिवशी कोरोनामुळे महाराष्ट्रात ७६ जणांच्या मृत्यूची नोंद, २ सहस्र १२७ नवीन रुग्णांची भर

१९ मे या दिवशी महाराष्ट्रात कोरोनाचे २ सहस्र १२७ नवीन रुग्ण आढळले असून या दिवशी राज्यात कोरोनामुळे ७६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामधील काही मृत्यू ३० एप्रिल ते १६ मे या कालावधीत झाले आहेत.

बुलढाणा येथे दळणवळण बंदीत ८ सहस्र ९१२ वाहनचालकांना २१ लाखांहून अधिक रुपयांचा दंड 

दळणवळण बंदीत बिनकामी फिरणार्‍या ८ सहस्र ९१२ वाहनचालकांना जिल्हा वाहतूक पोलीस शाखेने २१ लाख ८२ सहस्र ७०० रुपयांचा दंड ‘ऑनलाईन’ पद्धतीने ठोठावला आहे.

भारतातील लिपुलेख, लिपियाधुरा आणि कालापानी या भागांवर नेपाळचा दावा

नेपाळ नवीन मानचित्र (नकाशा) प्रकाशित करणार

भारत दादागिरी करत असल्याचा नेपाळच्या पंतप्रधानांचा कांगावा

भारताच्या राजचिन्हावर सत्यमेव जयते लिहिलेले आहे कि सिंहमेव जयते?, असा प्रश्‍न नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांनी नेपाळच्या संसदेत उपस्थित केला. याद्वारे त्यांना भारताला सत्याचा विजय हवा आहे कि सिंहासारख्या शक्तीचा विजय हवा आहे ?, असे सांगायचे होते.

गुरुपौर्णिमेला ४६ दिवस शिल्लक

गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्‍याचदा टाळतो.

चीनच्या वाढत्या कुरापती रोखण्यासाठी भारताकडून लडाखमध्ये सैन्यदलाच्या अतिरिक्त तुकड्या नियुक्त

भारताने लडाखमधील डेमचॉक, चुमार, दौलत बेग ओल्डी आणि गालवान व्हॅली या भागांमध्ये सैन्याच्या अतिरिक्त तुकड्या नियुक्त केल्या आहेत.
मेच्या पहिल्या आठवड्यात लडाखच्या पॅनगाँग येथे भारत आणि चीन यांचे सैनिक परस्परांना भिडले होते. या वेळी झालेल्या झटापटीत दोन्ही देशांचे सैनिक घायाळ झाले होते.

(म्हणे) भारताने चीनच्या सीमेमध्ये घुसखोरी केली !

भारताने अक्साई चीन भागात चीनच्या सीमेमध्ये प्रवेश केला आहे. भारताने चीनसमवेत झालेल्या कराराचे हे उल्लंघन आहे. भारताच्या या कृतीने दोन्ही देशाच्या सैन्यांतील संबंधाना हानी पोचली आहे.

तालिबान काश्मीरच्या विषयात हस्तक्षेप करणार नाही ! – तालिबानचा खुलासा

तालिबानने उद्या हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर त्यालाही भारतीय सैन्य योग्य धडा शिकवील, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे !

गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढणार ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

राज्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३९ वर पोचली आहे. काही रुग्णांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अंतिम चाचणी केली जात आहे. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.