‘सत्पात्री दान’ तसेच दान आणि अर्पण यांचे महत्त्व अन् त्यांतील भेद

श्री. शिरीष देशमुख

१. पूर्वीच्या राजांनी केलेला दानधर्म

‘पात्रे दानम् ।’ हे सुभाषित सर्वश्रुत आहे. दानाचा अर्थ ‘एखाद्याची मिळकत आणि त्यातून होणारा व्यय वजा करून शिल्लक रहाणार्‍या रकमेतून सामाजिक किंवा धार्मिक कार्याला केलेले साहाय्य’, असाही होतो. दान हे पैशांव्यतिरिक्त भूमी, अलंकार आणि कपडे (देवीला चोळी, साडी इत्यादी) अशा अनेक माध्यमांतून केले जाते. प्राचीन काळी राजे हिंदु देवळांना मोठ्या प्रमाणात दान देत होते. भारतातील केरळ राज्यात असलेल्या श्री. पद्मनाभ मंदिराची संपत्ती अद्यापही अगणित आहे. पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी राणीपदावर असतांना त्यांना मिळणार्‍या मानधनातून विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्याची साक्ष उत्तरेतील वाराणसीपासून ते दक्षिणेतील घृष्णेश्‍वर शिवमंदिरापर्यंत आहे.

२. दान देणार्‍यांनी ‘आपला पैसा योग्य कार्यासाठी आणि योग्य मार्गाने व्यय होतो ना ?’, याची निश्‍चिती करणे आवश्यक

अनेक दानशूर सामाजिक कर्तव्याच्या भ्रमात असतात आणि ते काही स्वयंसेवी संस्थांना (एन्.जी.ओ. ना) दान देतात. दान देतांना दान देणार्‍यांनी ‘आपला पैसा योग्य कार्यासाठी आणि योग्य मार्गाने व्यय होतो ना ?’, याची निश्‍चिती करणे आवश्यक आहे. अनेक स्वयंसेवी संस्था त्यांना मिळालेल्या पैशांतून पूर्णकालीन असणार्‍या कर्मचार्‍यांना वेतन देतात, तसेच त्यांचा कार्यालयीन व्यय, वाहने यांवर अवाढव्य व्यय करतात. मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेच्या लेखा परीक्षणात दानात मिळालेले पैसे पंचतारांकित उपाहारगृहात निवास आणि मद्यपान यांवर व्यय केल्याचे उघडकीस आले आहे.

३. दान हे ‘सत्पात्री’ असणे आवश्यक असणे

‘सत्पात्री दान’ ही संज्ञा महत्त्वाची आहे. हिंदु धर्म हा सनातन धर्म आहे. त्यामुळे या धर्माचे पालन करणार्‍यांनाच ईश्‍वरप्राप्ती आणि मोक्षप्राप्ती होते. याचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा; म्हणून ‘हिंदु धर्माचा प्रसार योग्य प्रकारे करणे’, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी दान देतांना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘ज्या संस्था किंवा आस्थापने धर्मप्रसार आणि राष्ट्रकार्यात कार्यरत असतात, त्यांना सर्वतोपरी साहाय्य करणे’, हे धर्मकार्यच आहे.

४. सनातन संस्थेने राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याला वाहून घेतलेले असल्याने या संस्थेला दिलेले दान हे ‘सत्पात्री दान’ असणे

सनातन संस्था ही अशी एक संस्था आहे की, जिने राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याला वाहून घेतलेले आहे. त्यामुळे या संस्थेला दिलेले दान हे ‘सत्पात्री दान’ आहे. सनातन संस्थेला दान देणार्‍या अनेकांना त्यांच्या मिळकतीत किंवा लाभात दानापेक्षा अनेक पटींनी वाढ झाल्याच्या अनुभूती आल्या आहेत.

५. दान आणि अर्पण यांतील भेद

अर्पण देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. दान हे देणार्‍याच्या मिळकतीतील एक भाग असतो, तर अर्पण म्हणजे स्वतःजवळ जे आहे, ते संपूर्ण किंवा त्यातील काही भागाचा त्याग करणे. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारे साधक तन-मन-धन अर्पण करतात, तसेच ईश्‍वरावर दृढ श्रद्धा असणारे याच प्रकारात मोडतात. दान आणि अर्पण हे दोन्ही शब्द समानार्थी असले, तरी त्यात सूक्ष्म भेद जाणवतो. तो पुढे दिला आहे.

‘गुरुदेवा, ‘हे विचार व्यक्त करण्याची बुद्धी आणि संधी तुम्हीच दिली’, त्यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. शिरीष देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.३.२०२०)