अभिनेते अरुण गोविल यांना श्रीरामाच्या वेशभूषेत स्टुडियोमध्ये परेड करण्याचा बीबीसीचा प्रस्ताव निर्माते रामानंद सागर यांनी फेटाळला होता ! – प्रेम सागर यांचा दावा

  • बीबीसीचा आतापर्यंतचा इतिहास हा हिंदुद्वेषीच आहे. त्यामुळे श्रीरामाच्या वेशभूषेतील कलाकाराला अशा प्रकारे परेड करायला लावून बीबीसीला हिंदूंच्या देवतांची खिल्ली उडवायची होती, असेच यातून लक्षात येते. अशा हिंदुद्वेषी विदेशी वाहिन्यांनी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !
  • अशा मोठ्या विदेशी वाहिन्याच्या दबावाला बळी न पडणारे रामानंद सागर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ! विदेशी चित्रपटसृष्टीसमोर मान तुकवणार्‍या भारतीय कलाकारांना यातून शिकण्यासारखे आहे !

मुंबई – अरुण गोविल यांना श्रीरामाच्या वेशभूषेत स्वतःच्या स्टुडियोमध्ये परेड करण्यास भाग पाडण्याची बीबीसीची योजना होती; परंतु निर्माते रामानंद सागर यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता, असा दावा त्यांचे पुत्र आणि रामायण मालिकेमध्ये त्यांना साहाय्य करणारे श्री. प्रेम सागर यांनी केला आहे. दळणवळण बंदीच्या काळात रामायणाच्या प्रसारणाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला.

बीबीसीला हवे होते संपूर्ण आशिया खंडामध्ये रामायणाच्या प्रसारणाचे अधिकार !

बीबीसी संपूर्ण आशिया खंडामध्ये रामायण प्रसारित करण्याविषयीचे हक्क विकत घेऊ पहात होती. रामानंद सागर यांना हा करार मान्य नव्हता. त्यांनी या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, असाही दावा श्री. प्रेम सागर यांनी केला.

अमेरिकेतील दैनिक वॉशिंग्टन पोस्टचा रामायणद्वेष !

दळणवळण बंदीच्या काळात रामायणाच्या पुनर्प्रक्षेपणाला मिळालेले अभूतपूर्व यश पाहून अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टने टीका केली आहे. कोरोनामुळे दळणवळण बंदीच्या काळात घरांमध्ये बंदिस्त केलेल्या दर्शकांमुळे रामायण जगातील सर्वांत अधिक टी.आर्.पी.वाला कार्यक्रम ठरला, असा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला होता. (जगभरातील लोकांनी त्यांना विविध पर्याय उपलब्ध असतांना हीच मालिका पहाण्यास प्राधान्य का दिले, याचा विचार वॉशिंग्टन पोस्ट का करत नाही ? यावरून हिंदूंच्या देवतांविषयी वॉशिंग्टन पोस्टला किती द्वेष आहे, हेच दिसून येते ! – संपादक)

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. प्रेम सागर यांनी स्वराज्य माग या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, केवळ रामायणच का ? सर्व वाहिन्यांचे दर्शक दळळवळण बंदीमधीलच होते.

रामानंद सागर ऋषितुल्य व्यक्तीमत्व !

रामानंद सागर एक रामभक्त होते. ते एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व होते. रामायण कालातीत आहे. त्यातून मिळणारी शिकवण आपल्याला नेहमीच प्रभावित करणारी आहे, असे श्री. प्रेम सागर यांनी सांगितले.