रामजन्मभूमीवर राममंदिर नव्हते, असे म्हणणारे आता तोंड का उघडत नाहीत ?
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील रामजन्मभूमी परिसरात राममंदिराच्या बांधकामानिमित्त सपाटीकरणाचे काम चालू आहे. या कामाच्या वेळी भूमीमध्ये विविध देवतांच्या खंडित मूर्ती, वेगवेगळ्या आकृत्यांचे आणि कलाकुसरीचे दगड, ७ ब्लॅक टच स्तंभ, लाल वाळूच्या दगडांचे ६ स्तंभ, पुष्पकलश आणि ५ फुटांच्या आकाराचे नक्षीयुक्त शिवलिंग सापडले आहे.
( सौजन्य: एबीपी न्यूज )
मूर्ती आणि शिवलिंग सापडणे हे हिंदूंना तालिबानी म्हणणार्या मुसलमान पक्षकारांना उत्तर ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असतांना मुसलमान पक्षाने आमच्यावर हिंदु तालिबान असल्याचा आरोप केला होता, तसेच या ठिकाणी कोणत्याही मंदिराचे अवशेष सापडले नसल्याचेही म्हटले होते. आता सापडलेल्या पुरातन मूर्ती या त्यांच्या आरोपांना उत्तर आहेत, असे हिंदू महासभेचे रामजन्मभूमी खटल्यातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितले.
अधिवक्ता जैन पुढे म्हणाले की, रामजन्मभूमी परिसरात अनेक मंदिरांचे अवशेष असल्याचे आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोरही सांगितले होते. याआधाही खोदकाम चालू असतांना पुरातत्व विभागाला एक शिवलिंग आढळले होते. पुरातत्व विभागाच्या अहवालातही या परिसरात मंदिरांचे अनेक अवशेष असल्याचे म्हटले आहे. बाबरी मशिदीच्या खाली राममंदिराची मोठी रचना होती. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेले म्हणणे किती खरे होते, हे आज मिळालेल्या पुराव्यांवरून सिद्ध होत आहे.

चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर दान चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांना नोटीस