अपघातामुळे कोमामध्ये गेलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना ७५ लाख रुपये देण्याचा देहली उच्च न्यायालयाचा देहली पोलिसांना आदेश

पोलिसांनी अयोग्य पद्धतीने बॅरिकेड लावल्याने अपघात झाल्याचे सिद्ध

हा दंड सरकारने न भरता संबंधित पोलिसांकडून वसूल केला पाहिजे !

नवी देहली – वर्ष २०१५ मध्ये देहली पोलिसांनी पंजाबी बाग येथे लावलेल्या बॅरिकेडमुळे (अडथळ्यामुळे) रात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघात धीरज नावाचा एक तरुण कोमामध्ये गेला होता. या प्रकरणी देहली उच्च न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला होता. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने पोलिसांना हानीभरपाई म्हणून अपघातग्रस्त मुलाच्या कुटुंबियांना ७५ लाख रुपये देण्याचा आदेश दिला. धीरज अद्यापही कोमामध्येच आहे.

न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणामध्ये देहली पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून येतो. पोलिसांनी रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेडवर कोणताही दिवा किंवा रिफ्लेक्टर लावले नव्हते. त्यामुळे दुचाकी वाहनावर असलेल्या धीरजला बॅरिकेड दिसले नाहीत.