सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने
साधनेचे अनेक मार्ग आहेत. आपण ‘ॐ’कार साधना केली, ध्यानधारणा केली, अलिप्त राहून अज्ञातात जाऊन साधना केली किंवा शक्तीपातयोगानुसार साधना केली, तरी या साधना पूर्णत्वाला गेल्या, तरच त्या जिवाला मोक्षप्राप्ती मिळते. साधना करतांना त्या व्यक्तीतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोणतीही साधना कितीही प्रयत्न करून केली, तरी ती फलद्रूप होत नाही. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाने जीव लवकर पूर्णत्वाला जातो.’
– सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ (१८.४.२०२०)