ईदच्या नमाजपठणासाठी मशिदी आणि इदगाह मैदाने उघडण्याची मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाली काढली

प्रथम राज्य सरकारला संपर्क करण्याची न्यायालयाची याचिकाकर्त्याला सूचना

  • दळणवळण बंदीच्या काळात हिंदूंनी त्यांच्या सणांच्या दिवशी मंदिरे उघडण्याची मागणी केली नाही; मात्र काही जण मशिदी उघडण्याची मागणी करून आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत, हे परत परत दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे !
  • कोरोनाशी लढण्यासाठी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असतांना अशा प्रकारची मागणी करणे म्हणजे सरकार आणि जनतेला मूर्ख समजण्यासारखेच आहे !
  • उत्तरप्रदेशामधील सरकार कोरोनाच्या नियमांविषयी कठोर असल्यानेच ते या मागणीला अनुमती देणार नाही, यामुळेच याचिकाकर्ते प्रथम राज्य सरकारकडे गेले नाहीत, हे लक्षात येते !

प्रयागराज – ईदच्या नमाजपठणासाठी मशीद उघडण्याची मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाली काढली. याचिकाकर्ता शाहिद अली सिद्दीकी यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती.

या याचिकेत सिद्दीकी यांनी ईदचे नमाजपठण करण्यासाठी उत्तरदेशमधील मशिदी आणि इदगाह मैदाने एका घंट्यासाठी उघडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला द्यावे, अशी मागणी केली होती. यावर मुख्य न्यायाधीश, न्यायमूर्ती गोविंद माथुर आणि न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा यांच्या पिठाने यासाठी याचिकाकर्त्याने प्रथम सरकारला संपर्क करावा, असे सांगत ही याचिका निकाली काढली.